महाराष्ट्र

अखेर संजय राठोड यांनी मौन सोडले……!

बीड दि.२३ – पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूचं बंजारा समाजाला आणि आम्हाला दु:ख झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. तिच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण केले जातेय.  मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. या प्रकरणावरुन गेल्या दहा दिवसांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदनामी करु नका, असं आवाहन संजय राठोड यांनी केले आहे.

तसेच मी भटक्या विमुक्त समाजातून, ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारा नेता आहे. माझ्या राजकीय जीवनाला उद्धवस्त करण्यासाठीचं षडयंत्र गेले. या कुठल्याच गोष्टीत तथ्य नाही. सर्वांना विनंती की माझी, कुटुंबाची आणि माझ्या समाजाची बदनामी करु नका. माझी पत्नी आहे, आई वडील आहे, मुलं बाळं आहेत, त्यांना सावरत होतो. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास आहे. मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार असून चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा असे ते म्हणाले.

दरम्यान सोशल मीडियावर फोटो आपण सर्वजण पाहता.परंतु अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. गेली 30वर्षे सामाजिक राजकीय जीवनात काम केले आहे. एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये  उभं करु नका, असं संजय राठोड म्हणाले. मी विश्वासाने सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. अरुण राठोडवर बोलण्यास मात्र संजय राठोड यांनी नकार दिला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close