राजकीय

वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्या……..!

मुंबई दि.२३ – वन मंत्री संजय राठोड  पोहरादेवी येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी केली होती. तेथे झालेल्या गर्दीवरून सध्या सरकारवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.

नियमबाह्य वर्तनाने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत सार्वजनिक कार्यक्रम,  धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी गर्दी न करता साजरे करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आज संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर प्रथमच बोलणार असल्याने सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close