ब्रेकिंग
तीन घरे जाळून खाक…….!

बीड दि.२५ – माजलगाव तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन घर जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी (दि.२५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. ही तिन्ही घरे सख्ख्या भावांची आहेत.
मोगरा गावापासून जवळच असणाऱ्या शिवाजी नगरतांडा येथे घरगुती गॅसला अचानक आग लागली.यामुळे लागलेल्या आगीने काही वेळातच रूद्र रूप धारण केले. काही मिनिटातच प्रकाश पवार,अशोक पवार,विकास पवार या तिन्ही भावाचे घरे जळून खाक झाले.यात मोठे आर्थिक नुकसान झाले असून यात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.माजलगाव नगर परिषदच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तहसील कार्यालया कडून घरचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान या आगीत तिन्ही भावाचे घरे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.