आरोग्य व शिक्षण

तर गरज भासल्यास परिस्थिती नियंत्रणात येइपर्यंत शाळा बंद ठेवा – वर्षा गायकवाड…….!

मुंबई दि.२६ – काही दिवसांपासून सातारा, लातूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहिल्या मिळाले. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

विद्यार्थी आणि शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे.तिथे आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड दिली आहे.

तसेच राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी समाजकल्याण मंत्री आणि आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close