क्राइम
बीड पोलीस विशेष पथकाचा धडाका……! ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त……!
बीड दि. २६ – सिंदफणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची विनापरवाना वाहतूक करणार्या चार टॅक्टर, एक जेसीबीसह तीन ब्रास वाळू असा एकूण ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवारी (दि. २५) पहाटे पोलीस अधीक्षक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी ही कारवाई आडगाव येथील सिंदफणा नदीपात्रात केली.
पिंपळनेरपासून जवळच असलेल्या आडगाव येथील सिंदफणा नदीपात्रात गुरुवारी (दि.२५) पहाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी सहकार्यांसह कारवाई करून एक जेसीबी ४ टॅक्टर आणि तीन ब्रास बाळू असा ५६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रभाकर देवडकर (वय-२८ रा. आडगाव),बाळू बनगर (वय-३२ रा. आडगाव), अंगद परिनकर (रा. आडगाव) आणि अशोक आबूज (रा.रांजेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अंगद परिनकर व अशोक आबुज हे फरार आहेत.