डिघोळअंबा येथील शेतकरी विलास रामहरी लोमटे यांचे कुटुंब २५ फेब्रुवारी त्यांच्या शेत सर्वे नं. १०६ मधील शेतात हरभरा पीक काढीत होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास आरोपी रघुनाथ भीमराव सोनवणे, बाबुराव भीमराव सोनवणे, बालासाहेब भीमराव सोनवणे, दत्ता बाबुराव सोनवणे, गणेश बालासाहेब सोनवणे, लक्ष्मीबाई बाबुराव सोनवणे, शोभा बालासाहेब सोनवणे, सुमन रघुनाथ सोनवणे हे हातात काठ्या घेऊन आले. त्यांनी आम्ही हरभरा पेरला आहे असे म्हणत लोमटे यांच्या आई आणि भाऊ चंद्रकांत याला काठीने मारहाण करीत दुखापत केली. याचवेळी विलास लोमटे व त्यांच्या पत्नीस ही वरील आरोपीतांनी काठीने व लाथाबुक्याने मारहाण करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद विलास लोमटे यांनी दिल्यावरून वरील आठ जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.