
केज दि.२६ – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तातडीच्या अंमलबजावणी करत आहे. मागच्या कांही महिन्यांपूर्वी केज शहर तसेच तालुक्यातील व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्याच प्रकारे पुन्हा कोरोना टेस्ट चे नियोजन करण्यात आले असून कोरोना टेस्ट केल्याशिवाय व्यवसाय करता येणार नसल्याच्या सक्त सूचना तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी दिल्या आहेत.
मागच्या कांही दिवसांपूर्वी व्यवसाय व इतर क्षेत्रात सूट दिली. मात्र याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. याच पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील जे व्यावसायिक आहेत त्या सर्वांच्या कोरोना टेस्ट चे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठी त्यांच्या जवळच्या उपकेंद्रात टेस्ट करून घेण्याची सोय करण्यात आली असून शहरातील व्यापाऱ्यांची टेस्ट उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. सदरील उपक्रम ६ मार्च पर्यंत चालणार आहे.
दरम्यान तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांनी निःसंकोचपणे ठरलेल्या तारखेला व नियोजित ठिकाणी आपली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंढके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांनी केले आहे. अन्यथा दुकाने उघडता येणार नाहीत अश्या सूचनाही केल्या आहेत.
खालील सूचनेनुसार कोरोना टेस्ट चे नियोजन करण्यात आले आहे.

