शेती
केज तालुक्यातील ”ते” सात शेतकरी गायब…….!
केज दि.२८ – मागच्या दोन दिवसांपूर्वी सोनेसांगवी -1 (ता.केज) येथील 7 तरुण शेतकऱ्यांनी ऊस वाहतुकीसाठी शेत रस्ता द्यावा म्हणुन आत्मदहनाच्या इशारा दिला होता. मात्र अद्यापही तहसिल कार्यालयाचा एकही आधिकारी तिकडे फिरकला नाही. न्याय मिळत नसल्याने आत्मदहन करण्याचा इशारा देणारे ते सात शेतकरी रात्रीपासून गायब झाले असून त्यांचे कांही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
शेत रस्त्याचे चे प्रकरण गेले चार सहा महिन्या पासुन तहसिल कार्यालयामध्ये प्रलंबित आहे. ताराखावर तारखा होत गेल्या मात्र प्रकरण निकाली निघत नाही. प्रकारण का निकाली लागत नाही? स्थळपाहणी अजुन का झाली नाही ? तहसिलदार साहेबानी आज पर्यंत भेट का दिली नाही ? अखेर कुणाच्या सागण्यावरुन हे प्रकरण थाबले आहे ? चार सहा महिन्या पासुनचा हा रस्ता मागणीचा विषय गांभीर्याने का घेतला जात नाही ? यासाखरे आनेक प्रश्न शेतकरयाच्या मणात घर करु बसले आहेत. शेत रस्ता होणे गरजेचे आहे. त्यामुळे मा.तहसिलदार साहेबांनी हा विषय तात्काळ हाताळुन शेतकऱ्याना न्याय द्यावा. मात्र आज पर्यंत तहसिल कार्यालयात चार ते सहा सुनावण्या झाल्या आहेत.
दरम्यान आत्मदन करणारे ते सात शेतकरी रात्रीपासून गायब झाले आहेत. ते कुठे आहेत गावात कोणालाही माहिती नाही. त्यांनी जर टोकाचे पाऊल उचलेले तर फार भयानक परस्थिती गावात निर्माण होणार आहे. तरी मा.तहसिलदार साहेबांनी तात्काळ यावर मार्ग काढून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी मुकुंद कणसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.