सेल्फी च्या मोहात दोघांचा बळी, चौघे वाचले…….!

करमाळा दि.१ – करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नासाठी आलेल्या अकलूज येथील शेंडगे कुटुंबाला उजनी जलाशयात सेल्फी काढण्याच्या नादात नाव उलटून शेंडगे कुटुंबातील बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जलाशयात असणाऱ्या इतर मच्छीमारांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून चौघांचे प्राण वाचवले.
काल दुपारी अकलूज येथील हे शेंडगे कुटुंब नावेतून उजनी जलाशयात मौजमस्ती करत होते. यावेळी उभे राहून सेल्फी घेताना नाव उलटली आणि यात विकास शेंडगे (39) आणि त्यांचा 13 वर्षाचा मुलगा जय याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र याचवेळी इतर मच्छीमारांनी या कुटुंबाला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या टाकत विकास यांची पत्नी स्वाती, नऊ वर्षाची मुलगी अंजली, विकासचे मित्र जयवंत सातव व सातव यांच्या मुलाला वाचवले.
दरम्यान दोन वर्षांपूर्वी उजनी जलाशयात नाव उलटून अकलूज येथील काही डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. वाचवण्यात आलेल्या शेंडगे यांच्या पत्नी व मुलीला उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.