क्राइम

अंबाजोगाईत भर रस्त्यावर तरुणाचा निर्घृण खून……!

अंबाजोगाई दि.१ –  शहरातील मोरेवाडी परिसरात २० वर्षीय तरूणाचा भर रस्त्यावर निर्घुण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.०१) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झाली. या घटनेने शहरात खळबळ उडाली.
            गणेश सुंदरराव मोरे (वय २०, रा. मोरेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार मोरेवाडी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ लोखंडी सावरगाव रोडवर गणेश मोरे याच्यावर काही व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने गणेशवर वार करण्यात आले.  हल्ल्यात अत्यावस्थ झालेल्या गणेशला स्वाराती रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार, पीएसआय सूर्यवंशी, कांबळे, एएसआय बोडखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनमुळे शहरात प्रचंड खळबळ आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत गणेश हा एका वाॅटर प्लान्टवर कामाला होता असे समजते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close