आपला जिल्हा

पूजा चव्हाण च्या वडिलांनी केली पोलीसात तक्रार…….!

परळी दि.२ – पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी पाच कोटी घेतल्याचा आरोप शांताबाई  राठोड यांनी केला होता. मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत पूजाचे वडील लहू चव्हाण  यांनी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलिसात तक्रार दाखल केेली आहे.

शांताबाई यांनी लहू चव्हाण यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन तोंड बंद केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन संतापलेल्या लहू चव्हाण यांनी बदनामीची तक्रार करत शांताबाई या पूजाची आजी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या भावकीत कदाचित त्या असतील पण गेल्या 25 वर्षांपासुुन आमची आणि शांताबाईंची भेट नाही. त्यामुळे चौकशी करून मग पुढील कारवाई करायला पाहीजे असेही लहू चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, पूजा चव्हाणच्या प्रकरणात संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे प्रकरण थांबेल असे वाटत असतानाच पुन्हा हे आरोप प्रत्यारोप होत असल्याने दिवसेंदिवस तिढा वाढत चालला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close