क्राइम

सुनेच्या जाचास कंटाळून सासऱ्याची आत्महत्या……!

बीड दि.6 – सुनेच्या सतत होणाऱ्या जाचास कंटाळून सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               भास्करराव अंबादास वडमारे (वय ६१, वर्ष रा. कागदी वेस बीड) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी सुनेच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून इमामपूर रोडवरील खडीमशीन परिसरात एका हिवराच्या झाडाला २४ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्यापुर्वी मी सुनेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे’, अशी चिठ्ठी मयताने लिहून ठेवली होती. याप्रकरणी भास्करराव वडमारे यांचा मुलगा अमोल वडमारे याच्या फिर्यादी वरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्योती अमोल वडमारे, श्रीमंत सरपते, चंद्रकला सरपते (सर्व रा. मादळमोही ता.गेवराई जि.बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close