ब्रेकिंग
केज तालुक्यातील भोंदू वैद्याची परभणी जिल्ह्यात करामत……! अत्याचाराचा गुन्हा दाखल……!
केज दि.8 – तालुक्यातील भोंदु वैद्याने परभणी येथील एका युवतीला बीड जिल्ह्यात पळवून आणत तिच्यावर अत्याचार केले. तसेच लग्न न केल्यास कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनिनाथ मच्छिंद्र सोनवणे (रा.मानेवाडी ता.केज)असे भोंदु वैद्याचे नाव आहे.
झाडपाल्यांचे औषध देवून आजार बरा करतो असे सांगत हा भोंदु गंगाखेड परिसरातील एका घरी वर्षभरापासून येत होता. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एका युवतीला, माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या आईवडीलांना तसेच कुटुंबियांना मारून टाकील अशी धमकी या भोंदू वैद्याने दिली. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मिनिनाथ सोनवणे व त्याच्यासोबत असलेल्या अश्विनकुमार राऊत याने त्या युवतीला गाडीत बसवत माजलगाव येथे आणून न्यायालय परिसरात असलेल्या नोटरी विक्रेत्याकडे मॅरेज सर्टिफिकेट तयार करून घेतले. त्याच दिवशी रात्री ११ वाजेच्या सुमारास मिनिनाथ सोनवणे याने या पीडित युवतीला वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील एका शेतात नेवून अत्याचार केले. २ मा्च पर्यंत या ठिकाणी पीडितेला डांबून ठेवले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात मिनिनाथ सोनवणे व अश्विन कुमार राऊत या दोघां विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.