”या” शेतकऱ्यांना मिळणार शून्य टक्के व्याज दराने कर्ज…….!

मुंबई दि.८ – महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं. 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले. शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्यात आलं. यंदा 42 हजार कोटींचं पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.
तसेच तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणाही अजित पवार यांनी केली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1.500 कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.