सर्वसामान्यांना काय मिळाले अर्थसंकल्पात……?
मुंबई दि.८ – ठाकरे सरकारने यंदाच्या वर्षी आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी विविध क्षेत्राला भरीव अशा निधींची तरतूद केली आहे. यातील महत्त्वाचे 10 क्षेत्र ज्याकडे सरकारने बारकाईने पाहत संबंधित क्षेत्रांना निधी दिला आहे.
अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के भरीव वाढ करण्यात आली आहे. तर तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार आहे. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी रूपयांची योजनेची घोषणा पवारांनी केली आहे.तर कृषी पंप जोडणी धोरणामध्ये महावितरणाला 1500 कोटी रूपयांचं निधी भांडवल मिळणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाचं धोरण म्हणजे विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी राज्य सरकार करणार आहे. तर अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुक्यांत अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा आणि आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये 62 एकर जागेवर ‘सिट्रस इस्टेट’ स्थापना करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटिका योजनेमध्ये भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. तर 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी प्रमाणे 4 वर्षांत 600 कोटी देणार येेणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेळी, म्हशी-गाई पालनासाठी पक्का शेड बांधण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे. तर मत्स्यव्यवसाय आणि मत्सविभागासाठी 3700 कोटी अर्थसंकल्पातून भेटणार आहेत.