क्राइम

अवघ्या दहा दिवसांत अंबाजोगाईत दुसरा खून……..!

अंबाजोगाई दि.११ – शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी (दि.११) पहाटे एका तरूणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यावर कुठल्यातरी वस्तूने प्रहार करून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
                    नितीन उर्फ बबलू साठे (वय ३८) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी पहाटे १२.३० वाजताचा सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याचा काही व्यक्तींसोबत वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत डोक्याला गंभीर इजा होऊन नितीनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
                 घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ घटनेमागच्या कारणांचा शोध घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तर, मुख्य संशयित फरार झाला असून त्याचा कसून तपास सुरू आहे. मागील महिन्यात नितीनचा या मुख्य संशयितासोबत वाद झाला होता, त्यातून हा प्रकार घडला असावा अशी माहिती सुत्रांनी दिली.
                   दरम्यान दहा दिवसापूर्वी शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात गणेश मोरे याचा भर रस्त्यावर निर्घुण खून करण्यात आला होता. या घटनेच्या धक्क्यातून शहर सावरत असतानाच बुधवारी पहाटे भांडणातून पुन्हा एक खून झाला. एरवी शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई शहराच्या प्रतिमेवर या दोन घटनांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close