पिंपळगाव येथील जालिंदर व्यंकट घोळवे ( वय ६५ ) यांनी ७ मार्च रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वार्ड क्र. १२ ( ए ) आयसीयू वार्डात त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ११ मार्च रोजी रात्री गहिनीनाथ जालिंदर घोळवे यांनी दिलेल्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार बाळकृष्ण मुंडे हे करत आहेत.
Hinganagava,ta-kallamb dist-osmanabad