आपला जिल्हा
सपोनि आनंद झोटे यांची बदली…….!

केज दि. 13 – तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि आनंद झोटे यांची अंबाजोगाई येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी अंबाजोगाई येथे कार्यरत असलेले संदीप दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात मागच्या कांही वर्षांपासून आनंद झोटे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून कार्यक्षेत्रात बऱ्यापैकी कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे काम त्यांनी केले.
दरम्यान पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या आदेशावरून झोटे यांची अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अंबाजोगाई येथे कार्यरत असलेले सपोनि संदीप दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.