एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची आत्महत्या……..!
नवी दिल्ली दि.१३ – बिहारच्या सुपौर जिल्ह्यातील संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि तीन मुलांची एकाच वेळेस आत्महत्या झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे कुटुंब कोळसा विकून त्यांचा गुजारा करत होते. मात्र आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
राघोपूर ठाणाच्या गद्दी गावातील वार्ड 12 मधील ही घटना असून काही दिवसांपासून हे कुटुंब गावातील लोकांना सोडून लांब राहू लागले होते. या कारणामुळे त्यांची चौकशी करण्याचंसुद्धा गावातील लोकांनी बंद केलं होतं. या कुटुंबाला लोकांनी शनिवार नंतर परत कधीच पाहीलं नसल्याचं गावातील लोकांनी सांगितलं. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिस रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. तेव्हा पोलिसांना मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी एफएसएलची टीम बोलावून मृतदेह खाली उतरवले.
सदरील कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे मिश्रीलाला यांनी त्यांची जमिन देखील विकली होती. सामुहिक आत्महत्यानंतर जिल्ह्याचे एस पी मनोज कुमारांनी या प्रकरणाची दखल घेतली. कुटुंबातील पाच जणांचा एकाचवेळी मृत्यू झाल्यामुळे प्रशासन देखील हैराण झालं आहे. मात्र या घटनेची कडक चौकशी करण्यात यावी, असा आदेश मनोज कुमारांनी दिला आहे.