#Job

नौकर भरतीसाठी सप्टेंबर मध्ये होणार सीईटी……..!

नवी दिल्ली दि.१४ –  केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारी नोकर भरतीसाठी सप्टेंबरमध्ये सीईटी आय़ोजित करण्यात येईल असं म्हटलं आहे. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असून सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीने एनआरएची स्थापना करण्यात आली आहे. तरुणांना विशेषत: सरकारी नोकरीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी सीईटी या वर्षी देशभरात आय़ोजित केली जाईल. ज्यामधून सरकारी नोकर भरतीसाठी उमेदवारांची निवड करता येणार असल्याची माहिती पीटीआयशी बोलताना सांगितलं. सप्टेंबर 2021 च्या दरम्यान या परीक्षा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

                          जितेंद्र सिंह म्हणाले की, डीओपीटीने केलेला हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्तीश: हस्तक्षेप केल्यानंतर आणि तरुणांबद्दल चिंता व्यक्त केल्यानं शक्य झाला आहे. एनआरए ही एक ही अशी संस्था असेल जी बी आणि सी वर्गातील पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करणार आहे. सर्वात मोठा बदल यामध्ये असा आहे की, देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र असणार आहे. यामुळे वेगवेगळ्या भागात दूर अंतरावर राहणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी पोहोचणं शक्य होईल असंही जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. महिला आणि दिव्यांग उमेदवारांसह आर्थिक परिस्थिती नसलेल्या उमेदवारांनाही यामुळे फायदा होणार असल्याची माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली.

                 स्टाफ सिलेक्शन कमीशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल रिक्रूटमेंट बोर्ड्स सारख्या सध्याच्या केंद्रीय रिक्रूटमेंट एजन्सी त्यांच्या गरजेनुसार भरती करू शकतील. सीईटी फक्त नोकरीसाठी उमेदवारांच्या सुरुवातीच्या स्क्रीनिंगसाठी असणार आहे असंही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close