#Social
मातंग समाजाला राजकीय पटलावर आणण्यासाठी डी पी आय कटिबद्ध — अजिंक्य चांदणे
गेवराई दि. १४ – मातंग समाज आजही राजकीय पटलावर नाही. इतर पक्षातील लोकांना जसा वयाच्या अठरा वर्षापासुन आपला पक्ष कोणता हे समजते तसे तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या तरूणाना हे माहीत असायला हवे की आपला पक्ष हा डी पी आय आहे असे प्रतिपादन डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केले आहे. गेवराई याठिकाणी डीपीआय पक्षाच्या कार्यलयाचे अनावरण मोठ्या थाटात संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.
व्यासपिठावर जिल्हाधक्ष सुभाष लोनके’ अमोल शेरकर, सुनिल पाटोळे, महेंद्रकुमार मुधोळकर यांची प्रमुख उपस्तिथी होती. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात ईतर समाजातील नेते मंडळीना मोलाचे स्थान आहे. धनगर समाज असो अथवा बोद्ध समाज असो या समाजांनी आपली राजकीय ताकद महाष्ट्रात दाखवली आहे त्याच पद्धतीने मातंग समाज जो पर्यंत आपली राजकीय ताकद दाखवत नाही तो पर्यंत समाजाला दिशा देणारे नेतृव आपल्याला मिळणार नाही .
स्मृतीशेष आत्मारामजी चांदणे तसेच सुकूमार कांबळे या दोन ज्वलंत समाजातील विचारवंत यांनी एका ठिकाणावर येऊन डीपीआय या पक्षाची स्थापना केली. मातंग समाजाला राजकीय अस्तित्व मिळावे म्हणून खडकावर हे डीपीआयचे रोपटे लावले आहे. तुम्हा आम्हा सर्वंना तसेच मातगं समाजातील तरूणानां माझे अवाहन आहे की मातगांचा पक्ष हा डीपीआयच आहे ईतर ठिकाणी काम करण्यापेक्षा समाजाच्या पक्षात काम करावे व डीपीआयचे हे झाड याला पाणी घालुन मोठे करावे. निश्चितच येणा-या काळात या झाडाची फळे आपल्याला चाखता येतील यात दुमत नाही. म्हणून या महाराष्ट्रात मातगं समाजाला राजकीय पटलावर आणन्याचं काम डीपीयाय करणार असुन आम्ही कटीबद्ध आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दादा भिसे , धम्मा त्रीभूवन , सचिन धुरधंरे , भगवान घोडे , अंकुश कांबळे , भास्कर हातागळे , अक्षय सुतार , आकाश सुतार , बल्लू शिंदे , विशाल सुतार , अशोक खरात , भैय्या जगधने , सतिष सराटे , गणेश साबळे , साईनाथ आडागळे , बाळासाहेब सुतार , अर्जून सुतार , नारायण भालेकर , पप्पू बांडे , सुभम धुताडमल , पवन धुताडमल , याच्यासह अंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
____________________________
संजय सुतार यांची डीपीआयच्या तालुका अध्यक्ष पदी फेर निवड
कार्यक्रात डीपीआय पक्षांचा प्रमुख निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये संजय सुतार तालुका अध्यक्ष , मदन हातागळे जिल्हा उपाध्यक्ष , अॅड सोमेश्वर कारके जिल्हा विधी सल्लागार , अमोल सुतार कार्यधक्ष यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या .