राजकीय
केज तालुक्यात मनसे सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद……!
केज दि.१५ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथून १४ मार्च रोजी सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला होता. केज तालुक्यात देखील सदस्य नोंदणीला शुभारंभ करण्यात आला असून तालुक्यातील नांदूरघाट येथून मनसे चे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी सदस्य नोंदीचा शुभारंभ केला.
केज तालुक्यातील प्रत्येक गावात मनसे चे पदाधिकारी जाऊन गावातील इच्छुक तरुणांची व नागरिकांची सदस्य नोंदणी करून घेणार आहेत. सदस्य नोंदणी ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होत असल्याची माहिती मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांनी दिली आहे.