क्राइम
केज तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड…..!
केज दि.१७ – तालुक्यातील कोरेगाव येथे शेतात पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर केज पोलिसांनी धड टाकून तिघांना ताब्यात घेत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे.
तालुक्यातील कोरेगाव येथे सावंतवाडी रोडवर सादिक शेख यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यावरून दि.17 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता सदरील ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी बालासाहेब सुखदेव गालफाडे रा. चिंचोलीमाळी ता. केज जि. बीड, प्रकाश विश्वनाथ गालफाडे रा. चिंचोलीमाळी ता. केज जि. बीड व सुरेश भिमराव पौळ रा. पालम ता. पालम जि. नांदेड ह. मु. कोरेगाव ता. केज जि. बीड हे विनापरवाना बेकायदेशिररीत्या स्वत:च्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावुन झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळुन आले.
दरम्यान संबंधित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत जुगाराचे साहित्य व रोख 2560 रुपये जप्त केले. सदरील प्रकरणी पोलीस नाईक सिद्धेश्वर हरिभाऊ डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिनकर पुरी हे करत आहेत.