केज तालुक्यातील एका वस्तीवर वास्तव्यास असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही १५ मार्च रोजी रात्री घरी होती. मात्र रात्री ९.३० ते १०.३० वाजेच्या दरम्यान ही मुलगी घरातून बेपत्ता झाली. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठे गेली याचा तपास लागला नाही. मात्र आरोपी कृष्णा बाळासाहेब जाधवर ( रा. काशीदवाडी ता. केज ) याने सदरील मुलगी ही अल्पवयीन आहे, हे माहीत असताना तिला अज्ञात कारणासाठी पळवून नेऊन तिचे अपहरण केले, याची खात्री पटल्यानंतर सदर मुलीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कृष्णा जाधवर याच्याविरुद्ध केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.