आरोग्य व शिक्षण
अन्यथा 10 वी 12 वी च्या परिक्षेवर बहिष्कार…….!
केज दि.18 – मागच्या 18 वर्षांपासून हजारो शिक्षक विना वेतन काम करत आहेत. कित्येक मोर्चे आंदोलने होऊनही सरकार कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. त्यामुळे येत्या 10 वी 12 वी च्या परिक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा केजचे गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
केज तालुक्यात शेकडो माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक विना वेतन शैक्षणिक कार्य इमाने इतबारे करत आहेत. वेतनासाठी मागवंग्या 18 वर्षांपासून अनेक आंदोलने केली. तर कित्येक शिक्षकांनी प्राण गमावले मात्र सरकारला अद्यापही जाग आलेली नाही. मागच्या 29 एप्रिल पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून त्याची सुद्धा दखल घेतली गेली नाही.
दरम्यान 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 प्रमाणे वेतनाचे सूत्र जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत 10 वी व 12 वीच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षक समन्वय संघ केजच्या वतीने देण्यात आला आहे.
सदरील निवेदनावर महादेव केदार, हनुमंत ढाकणे, अशोक इतापे, अनिल पारखे, संदीप शेंडगे, पुरुषोत्तम शिंदे, अतुल जाधव, वाय. एस. सूर्यवंशी, रमाकांत ढाकणे, बाबासाहेब काळे, संदीप गुळवे, अशोक बोबडे, सूर्यकांत वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.