क्राइम
एकाच ठिकाणी सलग दोन दिवस चोरी…….!

केज दि.१९ – तालुक्यातील साळेगाव येथील केज – कळंब रोडवरील एका रसवंती गृहातून सलग दोन दिवस चोरी झाली असून एक फ्रीज आणि डिझेल इंजिन चोरीला गेले.सदरील घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथील मुकेश अंधारे हे केज-कळंब रोड लगत साळेगाव शिवारातील माळेगावचे लवण नावाने ओळखल्या जात असलेल्या शिवारात एक रसवंती आहे. दि. १७ मार्च रोजी अज्ञात चोरट्यानी पत्रा कापून आतील गोदरेज कंपनीचे फ्रीज चोरून नेले. त्या नंतर पुन्हा दि. १८ मार्च रोजी दुसऱ्या दिवशी रात्री रसवंतीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील चरख्याला वापरण्यात येणारे डिझेल इंजिन चोरून नेले. त्यामुळे व्यावसायिक धास्तावले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.