आपला जिल्हा
केज शहरात पार्किंग नियम लागू, उल्लंघन केल्यास होणार कारवाई……!
पी1 पी2 पार्कींग प्रमाणे होणार पार्किंग
केज दि.२० – शहरातील कानडी रोडवरील वाहतूक आणि पार्किंग समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सम आणि विषम तारखेला पी-१, पी-२ अशी पार्किंग नियमावली लागू केली असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.
केज शहरातील कानडी रोड परिसरातील कानडी चौक ते कोकिच पीर दर्गा या दरम्यान वाढत्या वाहनांमुळे पार्कीगची समस्या उदभवत आहे. शहरांमधील या रस्त्यावरील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्कीगमुळे वाहतूक कोंडी व अपघात होत असुन नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. यावर उपाय करण्याच्या अनुषंगाने हद्दीतील व्यापारी, नगरपंचायतचे पदाधिकारी यांचे सोबत चर्चा करुन सर्वांनुमते सदर शहरांमधील वाहनांची पी-२, पी -२ ( सम व विषम ) पार्कंग व्यवस्था पार्कीग व्यवस्था लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी याची अधिसुचना निर्गमीत केली आहे. सम तारखेला रस्त्याच्या पूर्व बाजूला आणि विषम तारखेला रस्त्याच्या पश्चिम बाजूला वाहने पार्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक त्रिभुवन यांनी केले आहे.
” वाहन धारकांनी आपली वाहने सम व विषम तारखेच्या नियमानुसार उभी करावीत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागले. “
प्रदीप त्रिभुवन
पोलीस निरीक्षक पो. स्टे. केज