केज दि.२२ – एकुरका ( ता. केज ) येथे पोलिसांनी छापा मारून मटका घेणाऱ्या एक जणास अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कमेसह मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज येथील पोलीस ठाण्यातील गुप्तचर शाखेचे पोलीस नाईक दिलीप गित्ते, बाळासाहेब अंहकारे, महादेव बहिरवाल या पोलीस कर्मचाऱ्यांनी २२ मार्च रोजी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास एकुरका येथील हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या हॉटेलवर छापा मारला. यावेळी हॉटेल चालक बबन श्रीकृष्ण केदार हा जास्त पैशाचे आमिष दाखवून कल्याण नावाचा मटका जुगार खेळविताना आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेऊन रोख नऊशे रुपये आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. पोना महादेव बहिरवाल यांच्या फिर्यादीवरून बबन केदार याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोना बाळू सोनवणे हे तपास करत आहेत.