केज दि.२३ – शहीद दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने आयोजित केलेल्या इमर्जन्सी रक्तदान शिबिरात केज शहर व तालुक्यातील २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीददिनी क्रांतिकारी शहीद सुपुत्रांना मानवंदना दिली.शिबिराचे उदघाटन जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड पाटील यांच्या हस्ते झाले.
सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने केज रोटरीने इमर्जन्सी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात उदघाटक पूर्णा येथील जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड पाटील यांनी रक्तदानाचे महत्व विशद करून मोठ्या संख्येने सहभागी महिला रक्तदात्यांचे कौतुक केले. त्यांनी केज रोटरीचेही इमर्जन्सी शिबिर आयोजनाबद्दलही विशेष कौतुक केले. त्यांच्या हस्ते शिबिरात सहभागी प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवती रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात बापूराव सिंगण, मोहन गुंड, प्रकाश खुळे, प्रमोद पवार, सोमेश शिंदे, मयूर मांडलिया, गणेश शेटे, सत्यम नखाते, दिग्विजय नखाते, गणेश नेहरकर, सचिन नेटके, प्रभा ठोंबरे, ज्ञानेश्वर सोळुंके, मीनाक्षी दौड, अशोक सिंगण, संकेत देशमुख, दत्ता झाटे, सुरेश अंबाड, अजय एखंडे, प्रणित गिरी व अस्मिता अजय एखंडे या २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक योगदान दिले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ केज चे अध्यक्ष हनुमंत भोसले, सचिव धनराज पुरी, प्रोजेक्ट चेअरमन बापूराव सिंगण, शोभा जाधव, माजी अध्यक्ष विकास मिरगणे, सीता बनसोड, अरुण अंजान, दादा जमाले यांच्यासह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.