मुंबई दि.२३ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं.
यापूर्वी मुख्यमंत्री पुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. आता रश्मी ठाकरे यांचा अहवाल आला असून त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी वर्षा या आपल्या निवासस्थानी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात भरती होण्याऐवजी होम क्वारंटाईन होण्याचा पर्याय निवडला असल्याची माहिती नुकतीच समोर आली