बीड दि.२४ – मागच्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात बिबट्याने घातलेला धुमाकूळ शांत झाला होता. मात्र पुन्हा एकदा पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी शिवारातील एका विहिरीत बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने पुन्हा खळबळ माजली आहे.
मागच्या दोन महिन्यांपूर्वी पाटोदा आणि आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालत अनेकांचे जीव घेतले होते. मात्र कालांतराने बिबट्याने आपला मोर्चा दुसरीकडे वळवल्याने सदरील परिसर शांत झाला होता. मात्र पुन्हा एकदा त्याच तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाले असून यावेळी मात्र बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. सदरील बिबटया नेमका कसा विहिरीत पडला याचा उलगडा झाला नसून ग्रामस्थांनी वनविभागाला संपर्क केला आहे.
दरम्यान सदरील बिबट्या रात्री बीड कल्याण मार्गावर कांही लोकांना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पुन्हा त्याचा मृतदेह दिसून आल्याने नेमका काय प्रकार आहे याचा शोध सुरू आहे.