#Lockdown
अखेर बीड जिल्हा झाला लॉकडाउन……!
बीड दि.24 – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनी लॉकडाऊनची भूमिका घेतल्यानंतर आता बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन लावला आहे. २६ मार्च पासून सुरु होणारे हे लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केले आहे. बीड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने संपूर्ण लॉकडाउनच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल . सुमारे १० दिवस म्हणजे ४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध राहतील.
दरम्यान या लॉक डाउन मध्ये सर्व आस्थापना, क्रीडा मैदाने, शाळा महाविद्यालय, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची वाहतूकही बंद राहणार आहे. किराणा दुकानांना 7 ते 9 या वेळेत किराणा माल पोहोंच करता येईल तर ठोक विक्रेत्यानाही 7 ते 9 या वेळात मालाचा पुरवठा करता येईल. धार्मिक स्थळें, लग्न समारंभ बंद राहतील. इत्यादी निर्बंध लागू करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.