#Accident

लातूर बार्शी रोडवर झालेल्या अपघातात केज तालुक्यातील चालक ठार…….!

केज दि.26 – लातूर पासून जवळच असलेल्या सात्रा जवळ 407 टेम्पोचा एका अन्य वाहना बरोबर अपघात होऊन केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
           अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील धनराज बब्रुवान मोटे हा त्याच्या टेम्पो मध्ये माल घेऊन लातूर बार्शी रोडने निघाला होता. मात्र त्याचा टेम्पो लातूर पासून कांही अंतरावर  गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात्रा जवळ असताना समोरून लोखंड घेऊन येणाऱ्या एका पिकअप सोबत अपघात झाला. अपघात प्रचंड भीषण असल्या कारणाने धनराज मोटे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर त्याच्या सोबत असलेला अन्य एकजण जखमी झाला असून त्याला दवाखान्यात हलवण्यात आले आहे. तर पिक अप चा चालक बेशुद्ध असून अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना शुक्रवारी दि.२६ रोजी दुपारी घडली असून सदरील अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट झालेले नाही.
           दरम्यान सदरील घटनेची माहिती मिळताच गातेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि विलास नवले हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close