
मुंबई दि.२८ – ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने जनरालिस्ट ऑफिसर Generalist Officer पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या पदासाठी अर्ज मागविले आले आहेत. जनरालिस्ट ऑफिसर या पदासाठी एकूण 150 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 62, ओबीसींसाठी 40, अनुसूचित जमातींसाठी 22, ईडब्ल्यूएससाठी 15 आणि एसटी प्रवर्गासाठी 11 रिक्तपदांचा समावेश आहे
उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठ / संस्थांकडून सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएमसारखे व्यावसायिक कोर्स केलेले असावेत. त्याव्यतिरिक्त कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. तर या पदासाठी उमेदवार 25 ते 35 वर्षे वयोगटातील असावा. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे वयाची सवलत लागू असणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांना 48,170 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तसेच इतर भत्तेही मिळणार आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 1180 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी 118 रुपये भरावे लागणार आहेत.
IBPS मार्फत घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1: 4 च्या गुणोत्तरात मुलाखतीच्या फेऱ्यांसाठी बोलवण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा 150 तर मुलाखतीसाठी 100 गुण आहेत. हे गुण 60 : 40 यामध्ये रूपांतरित केले जातील. ऑनलाईन आणि मुलाखतीच्या दोन्ही परीक्षांच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
दरम्यान उमेदवार या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in वर घेऊ शकतात.