
बीड दि.२८ – जिल्ह्यात दहा दिवसांसाठी संपूर्ण लॉक डाउन करण्यात आले आहे. तर यामध्ये कांही आस्थापना मर्यादित स्वरूपात सुरू ठेवण्याचे तर कांही आस्थापना पुर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यात मांसाहाराची दुकानेही संपूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र त्यामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज निर्गमित केलेल्या आदेशात दिनांक २९.०३.२०२१ रोजी पासून सकाळी ०७.०० ते १०.०० वा. या वेळेत बीड जिल्ह्यातील मांसाहाराची दुकाने मर्यादीत स्वरुपात व निर्बधासह सुरु राहतील. त्यादरम्यान सर्वांनी मास्क चा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवणे, मांसाहर विक्रेत्याने ऍन्टीजन/ आरटीपीसीआर तपासणी केली असल्या बाबतचे प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे, दुकानाबाहेर गर्दी होऊ नये याकरिता ६ फुटांवर मार्किग करणे बंधनकारक असेल.
दरम्यान सदर आदेशाचे पालन न करणारी/उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती संस्था अथवा समुह यांनी साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहीता १८६० नुसार गुन्हा केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.