क्राइम

समजावून सांगितले तरी पत्नीने ऐकले नाही…….!

बीड दि.२९ – पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पटीने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पत्नी व तिच्या प्रियकरा विरोधात पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.                      विवाहित स्त्रीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते ही बाब तिच्या नवऱ्याला कळल्यावर त्यांनी त्याचा विरोध केला. पण त्याला न जुमानता त्या स्त्रीने आपले संबंध ठेवल्याने, पतीने आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मृत तरुणाच्या भावाने आष्टी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आष्टी तालुक्यातील वाहन चालकाच्या पत्नीचे भावकीतील तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. याबाबत पतीने त्याच्या भावाला सांगून पत्नीची समजूत घालण्यास सांगितलेे. त्यामुळे शनिवारी भावाने पत्नीसह पुण्याहून येत भावजयीला व तिच्या प्रियकराला बोलावून घेतले आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच पतीनेही पत्नीच्या प्रियकराला तिला फोन करू नको किंवा भेटू नकोस असे सांगितले. परंतु, त्या दोघांनीही त्यास नकार दिला. उलट तूच आमच्या प्रेमाच्या आड आलास तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी पतीला धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रियकरा पाठोपाठ पत्नी घरातून निघून गेली. अखेर पतीने बुधवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी व तिच्या प्रियकरावर अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close