क्राइम

केज तालुक्यात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल……..! 

केज दि.३१ – शेतात एकटीच असलेल्या २३ वर्षीय महिलेस लज्जास्पद बोलून व तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी केज पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
        केज तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय महिला शेतात एकटीच असल्याची संधी साधून विनोद नवनाथ चव्हाण ( रा. धोत्रा ता.  केज ) याने पीडित महिलेस लज्जास्पद बोलून व वाईट हेतुने हात धरुन विनयभंग केला. तु कोणाला काही सांगितलेस तर तुला जिवे मारुन टाकीन अशी धमकीही दिली. ही घटना २९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनोद चव्हाण याच्याविरुध्द केज पोलिसात ३० मार्च रोजी रात्री उशिरा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close