आश्चर्यकारक……. एक किलो भाजीची किंमत एक लाख रुपये…….!
पाटणा दि.२ – जेवढी वस्तू दुर्मिळ तेवढी किंमत जास्त हा सर्वज्ञात नियम आहे.तर वेगळे प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला यश हमखास मिळते हेही तेवढेच खरे आहे. एखाद्या वस्तूला भाव असेल अन ते पाहून दुसऱ्यानेही तेच केले तर त्याला किंमत येत नाही. मात्र प्रवाहाच्या विरोधात जाऊन धाडस केले तर दखल घेतली जाते अन अपेक्षित फळही मिळते. अन असाच एक धाडसी प्रयोग एका तरुणाने केला असून त्याचा तो प्रयोग लाख मोलाचा ठरत आहे.
बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्हात राहणाऱ्या अमरेश सिंग नावाचा शेतकरी ‘हाॅप शूट्स’ भाजीची शेती करतो. या भाजीचा उपयोग आधी औषध तयार करण्यासाठी होतं होता, मात्र आता याचा उपयोग जेवणात खाण्यासाठी केला जात आहे. असं मानलं जातं की या भाजीचा उपयोग शरिरातील कॅन्सर सेल्स मारण्यासाठी केला होतो. हाॅप शूट्सच्या गुणधर्मांमुळे ही भाजी चांगल्या प्रकारे परिणामकारक आहे.
हाॅप शूट्सच्या फुलांना हाॅप कोन्स म्हणतात. या फुलांचा उपयोग महागड्या बियर तयार करण्यासाठीही केला जातो. तर या हाॅप शूट्सच्या फांद्याचा उपयोग जेवणात केला जातो. ही भाजी आतापर्यंतची सर्वात महागडी भाजी समजली जाते. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी या बद्दल ट्विट केल्यानंतर या भाजीची प्रसिद्धी सगळीकडे होत आहे.
दरम्यान औरंगाबाद जिल्हात राहणाऱ्या अमरेश सिंग नावाचा शेतकरी ‘हाॅप शूट्स’ या भाजीची शेती करतो. अशा प्रकारची शेती करणारे ते भारतातील पहिलेच शेतकरी आहेत.