मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लॉक डाउन चा इशारा…..!
मुंबई दि.२ – महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन चा इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे पुण्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुण्यात 7 दिवसांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल, तर दिवसा जमावबंदी लावण्यात आली आहे. पुण्याचा हाच पॅटर्न लागू होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलताना, राज्यातील 8 जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात येतील असं स्पष्ट केलं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे,मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,अहमदनगर, या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात येणार आहेत.