#Accident

ट्रक आणि एसटी बसचा अपघात….!

6 / 100 SEO Score
केज दि.५ – केज-कळंब रोडवर साळेगाव पासून जवळ असलेल्या चिंचोली पाटी, हॉटेल लालपरी जवळ सकाळी ६:०० वाजता एका रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कोल्हापूर माजलगाव गाडीची धडक लागली. अपघातात एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरसह इतर तेरा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना ॲम्ब्युलन्सचे पायलट सुमित तेलंग हे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.
तसेच या अपघाताची माहिती जय जोगदंड यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. त्याच बरोबर पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले.
दरम्यान सर्व जखमींवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना संदर्भात सेवेसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे सुमित तेलंग यांच्या ॲम्ब्युलन्स मधून हलविण्यात येत आहे. दरम्यान अपघातस्थळी पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांनी भेट दिली.
जखमींची नावे :-
१) ड्रायव्हर आनंद गायके, वय ४० वर्ष, २)कंडक्टर विष्णू तांबडे वय (४२ वर्ष) आणि प्रवासी ३)संजय खरात वय (३५ वर्ष), ४)चैतन संजय खरात, वय (१६ वर्ष), ५)भास्कर गायकवाड, वय (३६ वर्ष), ६)आशा खरात, वय (२५ वर्ष), ७) सचिन खरात, वय (३० वर्ष), ८)रोशनी खरात, वय (१८ वर्ष), ९) भाग्यश्री गायकवाड, वय (३० वर्ष), १०)पायल गायकवाड, वय (१५ वर्ष) आणि ११) सुनिता खरात, वय (३२ वर्ष),  १२) सचिन सुरवसे, वय (४५ वर्ष), १३) वैशाली राऊत वय (३२ वर्ष)

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close