#Accident
केज तालुक्यात आगीच्या दोन घटना…….!
केज दि.५ – तालुक्यातील साळेगाव येथे जळीतच्या दोन घटना घडल्या असून यामध्ये सुमारे पाऊण लाखाचे नुकसान झाले आहे.
दि. ४ एप्रिल रविवार रोजी सतीश गित्ते यांच्या शेतात ज्वारीचे खळे करण्यासाठी काढून ठेवलेल्या ज्वारीच्या कणसाच्या ढिगाला आग लागून संपूर्ण ढीग जळून खाक झाला. यात सुमारे ५० हजार रु. चे नुकसान झाले. सदर आग ही विज वाहक तारेच्या शॉर्ट सर्किट किंवा स्पार्किंगमुळे झाली असावी अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत साळेगावच्या बस स्टँडवरील तुकाराम गित्ते यांची पानाची टपरी जळून खाक झाली. यात टपरी व आतील साहित्य जळून सुमारे २५ हजार रु. चे नुकसान झाले आहे. सदर आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र एकाच दिवशी साळेगाव येथे आगीच्या दोन घटना घडल्यामुळे पाऊण लाखाचे नुकसान झाले आहे.