क्राइम
तिर्रट खेळणाऱ्या १० जणांना पकडले ; २ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त..…….!
एसपीच्या विशेष पथकाची कारवाई
केज दि.७ – पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कोरडेवाडी ( ता. केज ) येथे छापा मारून तिर्रट खेळणाऱ्या १० जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून नगदी ५२ हजार रुपये, १० मोबाईल, ३ दुचाकी असा २ लाख ५० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास कोरडेवाडी शिवारातील सुदाम भागोजी वरपे यांच्या शेतात छापा मारला. यावेळी किन्हीच्या झाडाखाली मोकळ्या जागेत गोलाकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना बापूराव राजाराम यादव, बाळासाहेब गणपती राख महींद्र सोपान यादव, शिवाजी सुदाम वरपे, भगवान सिताराम कोरडे, सुदाम भागोजी वरपे ( सर्व रा. कोरडेवाडी ता. केज ), गोविंद नवनाथ आवाड ( रा. देवगाव ता. केज ), दत्तात्राय निवृत्ती गुट्टे, नारायण केरवा वाघमारे, ( दोघे रा. विडा ता.केज ), सुग्रीव भाऊ सांगळे ( रा. आंधळेवाडी ता.केज ) यांना रंगेहाथ पकडले. त्यांची झडती घेऊन पथकाने जुगाराचे साहित्य, नगदी ५२ हजार ७५० रुपये, ५८ हजार रुपयांचे १० मोबाईल, १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ३ दुचाकी असा २ लाख ५० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस शिपाई संदीप मोरे यांच्या फिर्यादीवरून वरील १० जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.