#Missing
केज शहरातून 32 वर्षीय महिला बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार……!
केज दि.७ – शेजारीच्या पापड्या घालून घरी परत येते. असे सांगून घरातून गेलेली दोन मुलांची आई असलेली महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने केज पोलीस ठाण्यात दिली आहे.
केज येथील कानडी रोड लगतच्या वसंत महाविद्यालया समोरील भागात राहणारी ३२ वर्षीय विवाहित महिला सुलभा रमेश मस्के ही दि. ५ एप्रिल सोमवार रोजी दुपारी ३.४५ वा. घरी पतीला सांगून शेजारच्या पापड्या करण्यासाठी जात असल्याचे म्हणून गेली. तर जाते वेळी मला न्यायला या असे नवऱ्याला सांगूनही गेली होती.
मात्र रात्री तिचा नवरा कामावरून घरी आल्या नंतर बायकोला न्यायला गेला; परंतु त्याची बायको ही त्यांच्याकडे गेलीच नसल्याचे समजले.
दरम्यान तिचा नवरा रमेश मस्के याने तिचे माहेर चांदेगाव तसेच नातेवाईकांकडे चौसाळा, जहागीरमोहा व केज येथे तपास घेतला असता ती आढळून आली नाही. तिच्या सोबत नगदी २ लाख रु. व सोन्याचे दागिने आहेत. तिचा बांधा मजबुत, चेहरा गोल, नाक सरळ, रंग काळा-सावळा, केस काळे, उंची १६० से.मी., अंगावर गुलाबी रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचाच ब्लाउज, पायात काळ्या रंगाची चप्पल आहे. अशा वर्णनाची महिला बेपत्ता झाली आहे. तिला १५ वर्षे व ते१३ वर्षा वयाची दोन मुले आहेत.
सदर बेपत्ता महिलेचा नवरा रमेश मस्के यांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात दि. ७ एप्रिल रोजी त्याची बायको सुलभा रमेश मस्के ही हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करीत असून सदर वर्णनाची महिला आढळून आल्यास केज पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.