क्राइम

बीड पासून जवळच असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

बनावट दारुसह 86 लाखांचा मुद्देमाल जप्त 

बीड दि.८ – बुधवारी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड, जालना व औरंगाबादच्या विभागीय भरारी पथकाने पिंपळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील नागापूर शिवारातील एका बंद अवस्थेतील जिनिंग मिलमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरु असल्याचे आढळून आले.
                  विभागाने सदर ठिकाणी धाड टाकली त्यावेळी तेथे आरोपी राजू किसन चव्हाण, रा. नवनाथ नगर, ता. जि.बीड, ऋषिकेष राजू चव्हाण, रा. नवनाथ नगर, ता. जि.बीड, रविंद्र किसन चव्हाण, रा. जुना मोंढा, ता. जि. बीड, आकाश वेताळ लोकरे, रा. नवनाथ नगर, ता. जि.बीड, विक्की वेताळ लोकरे, रा. नवनाथ नगर, ता. जि.बीड, निखिल कचरु घुले, रा. पांडुरंग नगर, ता. जि. बीड हे इसम स्पिरीटपासून  बनावट देशी दारू तयार करून त्याची बॉटलिंग करताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65,80,81,83,90 व 108 कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना जागीच अटक करण्यात आलेली आहे. तर यातील मुख्य सूत्रधार रोहित चव्हाण हा आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
               सदरच्या ठिकाणाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पिरिट ने भरलेले 200लिटर क्षमतेच्या  एकूण 12 ड्रम असा 2400 लिटर मद्यार्काचा साठा, चारशे लिटर बनावट तयार देशी दारू ब्लेंड, 1 लाख बनावट बुचे , रिकाम्या बाटल्या, बनावट लेबल्स, कागदी खोके, 1000 लिटर क्ष्मतेचे 3 रिकामे प्लास्टिक बॅरेल, मेजरींग ट्यूब, अल्कोहोल मीटर असा बनावट दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य जप्त केले, तसेच या सोबत बनावट दारू तयार करून त्याची बॉटलिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे एक फुल्ली आटोमेटिक बॉटलींग मशीन, एक मॅन्युअल बॉटलींग मशीन ,पाणी फिल्टर मशीन, ब्लेंड मिक्सिंग मशीन , बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्वाद अर्क, चार चाकी महिंद्रा कंपनीचा पिकअप वाहन MH-24AU 2594, एक पाण्याचा टँकर MH17 A 8810, दोन मोटरसायकली , इ. साहित्य जप्त केले.  सदर गुन्ह्यातील पुढील तपासात एमआयडीसी भागात एका गोडाऊनवर धाड टाकली असता त्या ठिकाणाहून 800 लिटर स्पिरिट व मॅन्युअल बॉटलिंग मशीन,   नोटा मोजण्याची मशीन आढळून आल्याने सदरचे साहित्यही जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्यात दोन्ही घटनास्थळावरुन 180 मिली क्षमतेच्या  बनावट देशी मद्याने भरलेल्या 1776 सीलबंद बाटल्या व 90 मिली क्षमतेच्या  बनावट देशी मद्याने भरलेल्या 200 सीलबंद बाटल्याचा साठाही विभागाने ताब्यात घेतला. सध्या लॉकडाऊन असल्याने बहुतांश मद्य विक्रीची दुकाने बंद असल्याने बनावट दारु तयार करुन त्याची विक्री करुन आर्थिक फायदा कमावण्याच्या उद्देशाने अटक आरोपी व साथीदार बनावट कारखाना चालवत होते. याचा सखोल तपास करण्यात येत आहे. तसेच आरोपीकडून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट, बनावट  लेबल्स, बुचे इत्यादी कुठून पुरवठा होत आहे याबाबत विभागाकडून सखोल तपास करण्यात येत आहे.
               सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप व विभागीय उप आयुक्त औरंगाबाद पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली डि. एल. दिंडकर निरीक्षक बीड, परिविक्षाधीन उपअधीक्षक श्री. इंगळे, शहाजी शिंदे निरीक्षक जालना, श्री. पडुळ दुय्यम निरीक्षक जालना, प्रविण ठाकूर, दुय्यम निरीक्षक विभागीय भरारी पथक औरंगाबाद, दुय्यम निरीक्षक श्री. गायकवाड, श्री. शेळके, श्री.  घोरपडे, श्री. राठोड, श्री. वाघमारे व सर्व जवान कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close