#Corona
योगासनासह रुग्णांच्या मनोरंजनावर भर द्या, केज येथील कोव्हिड सेंटरला केंद्रीय आरोग्य पथकाची भेट…….!

केज दि.८ – कोरोना रुग्णाला उपचाराबरोबरच मानसिक समाधानाची गरज असते. सदरील रुग्णांना एकटेपणा वाटू नये यासाठी रुग्णांचे मनोरंजन होणे गरजेचे असून योगासनावरही भर देण्याचा सल्ला केंद्रीय पथकाने दिला. केंद्रीय पथकाने केज येथील कोव्हिड सेंटरला भेट दिली यावेळी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन योग्य ते पाऊल उचलत आहे. कोरोना आटोक्यात आणण्या साठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसुन येत आहे. असे मत आरोग्य पथकातील प्रमुख अधिकारी डॉ.रक्षा कुंदल, डॉ.कुशवाह यांनी व्यक्त केले.
सदरील पथकाने दि.९ रोजी सकाळी केजच्या कोविड सेंटरला केंद्रीय आरोग्य पथकाने भेट दिली. यावेळी पथकाने संपुर्ण कोविड सेंटरची पहाणी केली.तसेच माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी केवळ केजच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यात कोविड सेंटरवर चांगले काम सुरु आहे. मात्र वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या बाबतीत हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी नविन काही उपयोजना राबविता येतात का ? हे पहाण्यासाठी आम्ही येथे आलो असल्याची माहीती त्यांनी दिली.
भेटी दरम्यान पथकाने होम कॉरंटाईन केलेल्या रुग्णांशी मोबाईल वर थेट संवाद साधून आरोग्य सेवेबद्दल विचारपूस केली. तसेच सेंटर वरील रुग्णांशीही प्रत्यक्ष बोलून कांही अडचणी आहेत का ? असे विचारले. तसेच सेंटर मधील रुग्णांना एकटेपणा जाणवू नये यासाठी नियमित योगासने व मनोरंजनावर भर देण्याचा सल्ला दिला. तसेच स्वच्छता व आहाराबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, उपजिल्हा रुग्नालयाचे अधिकक्षक डॉ.संजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.दत्तात्रय चाटे, डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे, डॉ. आकाश बचुटे, नगरपंचायतचे सय्यद अतिक, तसेच पोलीस अधिकारी, महसूल अणि आरोग्य विभाागचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
दरम्यान केज कोव्हिड सेंटवरची 100 खाटांची मर्यादा आहे. मात्र सध्या जवळपास सव्वाशे रुग्ण उपचार घेत आहेत. एका रूममध्ये चार खाटा असून त्यामध्ये आणखी तीन खाटा वाढवण्याचा सल्ला केंद्रीय पथकाने दिल्यानंतर प्रत्येक रूममध्ये तीन तीन खाटा तात्काळ वाढवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आठवले यांनी दिली.
