#Vaccination
कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात हजर रहावे…….!
केज दि. १२ – देशात सर्वत्र लसीकरण सुरू झाल्यानंतर कांही दिवसांनी केज शहरातील उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यामध्ये कोविशील्ड तसेच कोवॅक्सिन लस देण्यात आली. परंतु कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी पूर्ण झाला असून ज्यांनी पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत त्यांनी केजच्या उपजलिल्हा रुग्णालयात येऊन दुसरा डोस घेण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांनी केले आहे.
कोवॅक्सिन आणि कोविशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोस चे अंतर ठरवण्यात आलेले आहे. त्यानुसार कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस 28 दिसानंतर घ्यावा असे सांगण्यात आले आहे. केज उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत 5470 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु पहिला डोस दिलेल्या बहुतांश नागरिकांना 28 दिवस झाले असून सध्या कोवॅक्सिन लसीचे 701 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे व ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन दुसरा डोस घ्यावा.
तसेच मागच्या दोन दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयात लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद असून येत्या 17 तारखेनंतर लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी रुग्णालयाशी संपर्क करूनच लसीकरणास येण्याचे डॉ.राऊत यांनी सूचित केले आहे.