ठरलं….. उद्या रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवस महाराष्ट्रात संचारबंदी…….!
मुंबई दि.१३ – महाराष्ट्रात वाढता कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून पंधरा दिवस राज्यात कलम 144 लागू केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवली आहे पण ती फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच वापरता येईल. सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू राहतील.
वैद्यकीय सेवा देणारे, वाहतूक करणारे व्यक्ती, आरोग्य क्षेत्राशी निगडित सर्व लोक यांना या संचार बंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे. तसेच इतर नागरिक 15 दिवस विनाकारण घराबाहेर पडू शकणार नाहीत. पत्रकारांनाही या संचारबंदीतून वगळण्यात आल आहे.
लवकरच मुख्यमंत्री संपूर्ण संचारबंदीचे आदेश जाहीर करणार आहेत. उद्या रात्री आठपासून हे संचार बंदीचे आदेश संपूर्ण महाराष्ट्रात लागू असणार असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक असल्याने त्यांना निवडणूक होईपर्यंत या संचारबंदीतुन वगळण्यात आल आहे. तसेच ई-कॉमर्स सेवा सुरू राहणार आहे व हॉटेल व्यवसायिक फक्त ऑनलाइन सेवा देऊ शकतात.