केज दि.१४ – शहरातील शिक्षक कॉलनी भागातून नातेवाईकांच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील माधव नगर भागातील बीएसएनएल टॉवरजवळ वास्तव्यास असलेले भगवान किसनराव सारूक हे १२ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिक्षक कॉलनी भागातील महादेव ठोंबरे या नातेवाईकांकडे आले होते. सारूक यांनी त्यांची २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी ( एम. एच. १२ केएक्स ०९३६ ) ठोंबरे यांच्या घरासमोर हॅन्डल लॉक न करता लाउन गेले. ते एक तासाने परत येईपर्यंत अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. भगवान सारूक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे पुढील तपास करत आहेत.