क्राइम

जवळबन येथे तरुणाचे डोके फोडले ; दोघा भावावर गुन्हा…..! 

केज दि.१४ – तालुक्यातील जवळबन येथे दोघा भावांनी एका तरुणास तुझ्याकडे कामाचे ५० रुपये राहिले असे कारण काढून शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण करीत काठीने डोके फोडल्याची घटना  बुधवारी घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
     जवळबन येथील सहदेव प्रभाकर गायकवाड ( वय २२ ) हा तरुण बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आईवडील, भावासोबत घरी होता. यावेळी गावातील प्रदीप संजय गायकवाड व प्रवीण संजय गायकवाड हे दोघे भाऊ हातात घेऊन आले. त्यांनी सहदेव यास तुझ्याकडे कामाचे ५० रुपये राहिले असे कारण काढून शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. हातातील काठीने डोक्यात मारून सहदेव याचे डोके फोडले. सहदेव गायकवाड याच्या फिर्यादीवरून प्रदीप गायकवाड व प्रवीण गायकवाड या दोघा भावाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close