केज दि.१६ – कोरोनाची परिस्थिती पाहता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित नांदूरघाट येथील गरजू, निराधार कुटुंबांना किराणा व जीवन आवश्यक साहित्याचे वाटप मनसेच्या वतीने शुक्रवारी सकाळी १० वाजता नांदूरघाट येथे करण्यात आले.
या वेळी मनसे चे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,केज तालुका उपाध्यक्ष गोविंद हाके,मनसे नांदूर घाट चे विभाग अध्यक्ष संतोष शिनगारे,योगेश गायकवाड,अशोक शिंदे,गणेश हाडदे,शंकर शिंदे आदींसह भीमनगर, अंबिकानगर मनसे शाखेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान मागच्या लॉक डाउन काळातही हातावरचे पोट असणाऱ्या गरजू कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून संपूर्ण तालुक्यात मनसेने घरोघर जाऊन शक्य असेल तेवढी मदत केली होती.तर आता सुद्धा तालुक्यात कुठल्याच राजकीय अथवा सामाजिक संघटनेने प्रत्यक्ष मदत केली नसून याची सुरुवात मनसेने करून सामाजिक बांधिलकी जपण्यास सुरुवात केली आहे.